गाथा १ ते ३००
Wikibooks कडून
मगंलाचरण - अभंग 6 1
समचरणदृिष्ट विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृित्त राहो ॥1॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुिश्चत झणी जडों देसी ॥2॥ तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥
2
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥ तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥
3
सदा माझे डोळे जडो तुझे मूताअ । रखुमाईच्या पती सोयरिया ॥1॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥3॥
4
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥1॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥2॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥3॥ सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥4॥
5
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥1॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥2॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥3॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥4॥ तुका ह्मणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥5॥
6
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥1॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥2॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥3॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वणिऩती पवाडे सनकादिक ॥4॥ तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥5॥
॥6॥
विराण्या - अभंग 25 7
वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥1॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥2॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । ह्मणे जालों तुका हरिरता ॥3॥
8
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकलियें ॥1॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥2॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका ह्मणे ॥3॥
9
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥1॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रह्म ॥2॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥3॥
10
नाहीं काम माझें काज तुह्मांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥1॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥2॥ न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका ह्मणे॥3॥
11
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥1॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥2॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका ह्मणे कानीं बहिरी जालें ॥3॥
12
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥1॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां॥2॥ आळ आला होता आह्मी भांडखोरी । तुका ह्मणे खरी केली मात ॥3॥
13
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥1॥ बिळयाच्या आह्मी जालों बिळवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥3॥
14
क्षणभरी आह्मी सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥1॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥2॥ तुका ह्मणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥3॥
15
आह्मां आह्मी आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥1॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥2॥ तुका ह्मणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥3॥
16
सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥1॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥2॥ तुका ह्मणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥3॥
17
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥1॥ नारायणा आह्मां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभािळली ॥2॥ तुका ह्मणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥3॥
18
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥1॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आह्मी नारायण एकाएकीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥3॥
19
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥1॥ न साहवे तुह्मां या जनाची कूट । बोलती वाइऩट ओखटें तें ॥2॥ तुका ह्मणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आह्मी ॥3॥
20
शिकविलें तुह्मीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥1॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥3॥
21
सांगतों तें तुह्मीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥1॥ जोंवरी या तुह्मां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥2॥ तुका ह्मणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥3॥
22
आजिवरी तुह्मां आह्मां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥1॥ आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तें चि करीं सुखें ॥2॥ तुका ह्मणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥3॥
23
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥1॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥2॥ न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका ह्मणे काई लाजों आतां ॥3॥
24
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥1॥ आतां तुह्मी पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी भयाभीत नारी । कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥3॥
25
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥1॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥2॥ तुका ह्मणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥3॥
26
अइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥1॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥2॥ तुका ह्मणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥3॥
27
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आह्मां तैशा ॥1॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥2॥ तुका ह्मणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥3॥
28
बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥1॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥3॥
29
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥1॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥2॥ तुका ह्मणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥3॥
30
न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥1॥ मानेल त्या तुह्मी अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥3॥
31
न बोलतां तुह्मां कळों न ये गुज । ह्मणउनी लाज सांडियेली ॥1॥ आतां तुह्मां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥2॥ तुका ह्मणे आह्मी बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥3॥
॥25॥
32
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥1॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥2॥ तुका ह्मणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥3॥
33
सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥1॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥2॥ तुका ह्मणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥3॥
34
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥1॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥3॥
35
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥1॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥2॥ तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥3॥
36
सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥1॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥2॥ गेले वारीं तुह्मीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥3॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥4॥ दो पाहरा मज लहरी येती। शुद्ध नाहीं पडे सुपती ॥5॥ नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥6॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥7॥ हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुह्मां नेणवे कैसें ॥8॥ तुका ह्मणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका नेला ॥9॥
37
पावलें पावलें तुझें आह्मां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥ जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आह्मां नको वाद त्यांशीं देऊं ॥2॥ तुका ह्मणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥
38
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥1॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आह्मां जोगा ॥ध्रु.॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥2॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥3॥ गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आह्मी ॥4॥ तुका ह्मणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया॥5॥
39
जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥1॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥2॥ दुसऱ्यातें आह्मी नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥3॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥4॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥5॥
40
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥1॥ ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उिच्छष्ट । नका मानूं वीट ब्रह्मरसीं ॥ध्रु.॥ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥2॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघें चि आर्त पुरवितो ॥3॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥4॥ तुका ह्मणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम॥5॥
41
अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥1॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥ विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥2॥ तुका ह्मणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥3॥
42
हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥1॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥2॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥2॥ तुका ह्मणे बरा । लाभ काय तो विचारा ॥3॥
43
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥1॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥2॥ जिवींच्या जीवना । तुका ह्मणे नारायणा ॥3॥
44
ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आह्मी भले शरणागत ॥1॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥2॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥3॥ हरि नाहीं आह्मां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥4॥ तुका ह्मणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥5॥
45
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि ॥ आपणाबाहेरी। न लगे ठाव धुंडावा ॥1॥ इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥2॥ तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा। अंगीं डोळे उघडी ॥3॥
46
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥1॥ अइका जी तुह्मी भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥2॥ तुका ह्मणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥3॥
47
आह्मी जरी आस । जालों टाकोनि उदास ॥1॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥2॥ तुमचें तुह्मांपासीं । आह्मी आहों जैसीं तैसीं ॥3॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥4॥ तुका ह्मणे चित्तीं। नाहीं वागवीत खंती ॥5॥
48
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥1॥ मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥ देहभोग भोगें घडे। जें जें जोडे तें बरें ॥2॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥3॥
49
जन विजन जालें आह्मां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥1॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥ वन पट्टण एकभाव। अवघा ठाव सरता जाला ॥2॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥3॥
50
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥1॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥ मोहरा होय तोचि अंगें। सूत न जळे ज्याचे संगें ॥2॥ तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥3॥
51
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥1॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥3॥
52
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥1॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥ टािळलें निमित्त । फार थोडें घात हित ॥2॥ यावें कामावरी । तुका ह्मणे नाहीं उरी ॥3॥
53
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुिद्ध । निर्मळ स्फटिक जैसा ॥1॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥ तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥ मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥ हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥2॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका ह्मणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥3॥
54
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥1॥ ह्मणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥2॥ तुका ह्मणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥3॥
55
महारासि सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥1॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥2॥ ज्याचा संग चित्तीं । तुका ह्मणे तो त्या याती ॥3॥
56
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥1॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥ नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥2॥ शेजारणीच्या गेली रागें ।कुतयांनी घर भरिलें मागें ॥3॥ पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥4॥ तुका ह्मणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥5॥
57
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥1॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥2॥ तुका ह्मणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥3॥
58
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥1॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥2॥ नेणे शब्द पर । तुका ह्मणे परउपकार ॥3॥
59
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥1॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥2॥ जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥3॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥4॥ तुका ह्मणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥5॥
60
आह्मी सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥1॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥ अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥2॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोणगुरें वासरें ॥3॥ जाली सकळ नििंश्चती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥4॥ तुका ह्मणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥5॥
61
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥1॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी ह्मणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥2॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥3॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥4॥ तुका ह्मणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥5॥
62
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥1॥ मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥2॥ तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥3॥
63
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥1॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥ मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥2॥ तुका ह्मणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥3॥
64
परिमळ ह्मूण चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥1॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥2॥ कर्मफळ ह्मणुनी इच्छूं नये काम । तुका ह्मणे वर्म दावूं लोकां ॥3॥
65
माया तें चि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥1॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥2॥ तुका ह्मणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥3॥
66
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥1॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥ येर येरा कांचणी भेटे। आगी उठे तेथूनी ॥2॥ तुका ह्मणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥3॥
67
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपाजिऩती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥1॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥2॥ तुका ह्मणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥3॥
68
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥1॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥2॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥3॥
69
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥1॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥2॥ तुका ह्मणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥3॥
70
ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥1॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥ गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥2॥ तुकां ह्मणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥3॥
71
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥1॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥2॥ तुका ह्मणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥3॥
72
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥1॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥ हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥2॥ तुका ह्मणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥3॥
73
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥1॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥2॥ तुका ह्मणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥3॥
74
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥1॥ भरतील पोट श्वानाचिया परी । विस्त दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥2॥ तुका ह्मणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥3॥
75
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥1॥ गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥ परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥2॥ न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥3॥ परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥4॥ तुका ह्मणे विटाळाची च तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥5॥
76
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥1॥ नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥2॥ तुका ह्मणे चित्त । मळिण करा तें फजित ॥3॥
77
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥1॥ जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥ भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥निष्ठउत्तरें। पापदृष्टी मळिणचित्त ॥2॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका ह्मणे खळ । ह्मणोनियां निषिद्ध तो ॥3॥
78
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥1॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥2॥ तुका ह्मणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया॥3॥
79
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥1॥ तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु. ॥ उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥2॥ तुका ह्मणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥3॥
80
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥1॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु. ॥ काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥2॥ तुका ह्मणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥3॥
81
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥1॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु. ॥ मिरासीचें ह्मूण सेत। नाहीं देत पीक उगें ॥2॥ तुका ह्मणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥3॥
82
न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥1॥ तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु. ॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥2॥ तुका ह्मणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥3॥
83
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥1॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु. ॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥2॥ तुका ह्मणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥3॥
84
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥1॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥ न वजती पाप । तीर्था ह्मणे वेचूं काय ॥2॥ तुका ह्मणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥3॥
85
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥1॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥2॥ सांडी थोरपणा । तुका ह्मणे सवें दीना ॥3॥
86
मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥1॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥2॥ धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥3॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥4॥ तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥5॥ तुका ह्मणे बापा । चुकवीं चौयाशींच्या खेपा ॥6॥
87
कानडीनें केला महाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥1॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा ह्मणोन । येरु पळे आण जाली आतां ॥2॥ तुका ह्मणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥3॥
88
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥1॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥ नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥2॥ तुका ह्मणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥3॥
89
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥1॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड। नको दृष्टीपुढें भांड ॥2॥ तुका ह्मणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥3॥
90
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥1॥ कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥ मानदंभासाठीं। केली अक्षरांची आटी ॥2॥ तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥3॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥4॥ तुका ह्मणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥5॥
91
संवसारतापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥1॥ ह्मणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥ बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥2॥ वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥3॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥4॥ तुका ह्मणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥5॥
92
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥1॥ मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥ माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥2॥ नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥3॥ प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥4॥ बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥5॥ तुका ह्मणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥6॥
93
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥ देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥2॥ तुका ह्मणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥3॥
94
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥1॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥2॥ खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥3॥ तुका ह्मणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥4॥
95
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥1॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥ भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥2॥ तुका ह्मणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥3॥
96
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥1॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥ न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥2॥ तुका ह्मणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥3॥
97
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥1॥ हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥ नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥2॥ वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥3॥ तुका ह्मणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥4॥
98
माया ब्रह्म ऐसें ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥1॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥ करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥2॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥3॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥4॥ तुका ह्मणे जयां पिंडाचें पाळण। न घडे नारायणभेट तयां ॥5॥
99
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥1॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥ संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥2॥ तुका ह्मणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥3॥
100
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥1॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥ काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥2॥ तुका ह्मणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥3॥
101
आतां तरी पुढें हा चि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥1॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥2॥ तुका ह्मणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥3॥
102
भHाविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥1॥ शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥ देवाविण भHा । कोण देता निष्कामता ॥2॥ तुका ह्मणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥3॥
103
विश्वाचा जनिता । ह्मणे यशोदेसि माता ॥1॥ ऐसा भHांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥ निष्काम निराळा। गोपी लावियेल्या चाळा ॥2॥ तुका ह्मणे आलें । रूपा अव्यH चांगलें ॥3॥
104
काय दिनकरा । केला कोंबडएानें खरा ॥1॥ कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥ आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥2॥ तुका ह्मणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥3॥
105
जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥1॥ ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥ सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥2॥ तुका ह्मणे करी । ताका दुधा एक सरी ॥3॥
106
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥1॥ कळों आलें खटएाळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥ फोडावें मडकें। मेलें लेखीं घायें एकें ॥2॥ तुका ह्मणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥3॥
107
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥1॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥ कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मिळण वरी ॥2॥ तुका ह्मणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥3॥
108
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥1॥ येर िप्रया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥ प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥2॥ तुका ह्मणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥3॥
109
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥1॥ हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥2॥ आली ऊर्मी साहे । तुका ह्मणे थोडें आहे ॥3॥
110
थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥1॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥ अवघ्या साधनांचें सार। न लगे फार शोधावें ॥2॥ तुका ह्मणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥3॥
111
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥1॥ मनुष्यदेहा ऐसा निध। साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥2॥ तुका ह्मणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥3॥
112
न करीं संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥1॥ या नांवें अद्वैत खरें ब्रह्मYाान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥ इंिद्रयांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥2॥ तुका ह्मणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥3॥
113
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥1॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीथॉ काळें देती फळ ॥2॥ तुका ह्मणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥3॥
114
तिथाअ धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥1॥ मिळालिया संतसंग । समपिऩतां भलें अंग ॥ध्रु.॥ तीथाअ भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥2॥ तुका ह्मणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥3॥
115
घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥1॥ भHा राखेे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥ अव्यH तें आकारलें। रूपा आलें गुणवंत ॥2॥ तुका ह्मणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥3॥
116
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे काुंफ्दे नाक ओढी ॥1॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥2॥ बोलों नयें मुखावाटां । ह्मणे होतां ब्यांचा तोटा ॥3॥ दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी ह्मणे होय ॥4॥ मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥5॥ होता भाव पोटीं। मुखा आलासे शेवटीं ॥6॥ तुका ह्मणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥7॥
117
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥1॥ अइका हो तुह्मी मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥2॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥3॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥4॥ तुका ह्मणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥5॥
118
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥1॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका ह्मणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥2॥
119
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुिद्ध नाहीं िस्थर ॥1॥ त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥ संतास जो निंदी। अधम लोभासाठीं वंदी ॥2॥ तुका ह्मणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥3॥
120
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥1॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होइऩल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥ तुका ह्मणे भितो पुढिलिया दत्ता । ह्मणऊनि चिंता उपजली ॥2॥
121
मांडवाच्या दारा । पुढें आणिला ह्मातारा ॥1॥ ह्मणे नवरी आणा रांड । जाळा नवयाचें तोंड ॥ध्रु.॥ समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥2॥ तुका ह्मणे खरा । येथूनिया दूर करा ॥3॥
122
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥1॥ त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥2॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥3॥ कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥4॥ तुका ह्मणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनी । गेलीं ह्मणतां मी माझें ॥5॥
123
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥1॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥2॥ आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका ह्मणे जाती नरकामधीं ॥3॥
124
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥1॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥ भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥2॥ उजवें वामांग । तुका ह्मणे एक चि अंग ॥3॥
125
वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥1॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आYाा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥2॥ वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥3॥ सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥4॥ सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका ह्मणे जाण। तुह्मी संत तदथाअ ॥5॥
126
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥1॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥3॥
जोहार - अभंग 3
127
मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥1॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥ फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥2॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥3॥ तुका ह्मणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥4॥
128
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥1॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥2॥ तुका ह्मणे उद्यां लावीन ह्मनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥3॥
129
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥1॥ धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥ वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥2॥ सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥3॥ घराकडे पाहूं नये सें चि जालें । अमानत केलें दिवाणांत ॥4॥ आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते नििश्चती बोलों नये ॥5॥
॥3॥
130
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परििक्षतीला हो दिसां सातां ॥1॥ उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥ त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥2॥ तुका ह्मणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥3॥
131
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥1॥ वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याइऩ जीवें नाश पावे ॥ध्रु.॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभािळतां वरि आंत चरे ॥2॥ तुका ह्मणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥3॥
132
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥1॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें निळकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥3॥
133
हरि तूं निष्ठ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥1॥ घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥
नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥2॥
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥3॥ कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥4॥ बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥5॥ िश्रयाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥6॥ तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती। तुका ह्मणे करिसी तें ॥7॥
134
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥1॥ तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥2॥ केलीं मागें नको राहों । तुज जमान आह्मी आहों ॥3॥ करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥4॥ तुका ह्मणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥5॥
135
बाळ बापा ह्मणे काका । तरी तो कां निपराध ॥1॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥ साकरेसि ह्मणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥2॥ तुका ह्मणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥3॥
136
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥1॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥2॥ तुका ह्मणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥3॥
137
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥1॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥2॥ तुका ह्मणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥3॥
138
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाइऩल तो त्यास न विसंभे ॥1॥ दुष्ट बुिद्ध चोरी करी निरंतर । तो ह्मणे इतर लोक तैसे ॥2॥ तुका ह्मणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥3॥
काला चेंडुफळी - अभंग 100
139
झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥1॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥ आगळा होऊनि धरी वरिचिया वरी। चपळ तो जिंके गांढएा ठके येरझारीं ॥2॥ हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥3॥ डाइप पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥4॥ तुका ह्मणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥5॥
140
अझुनि कां थीर पोरा न ह्मणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥1॥ मोकळा होतासि कां रे पडिलासि डाइप । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥ मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कविळलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥2॥ तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥3॥ सांडितां ठाव पुढें सइऩल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥4॥ तुका ह्मणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥5॥
कोडें - अभंग 2
141
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥1॥ पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काइऩ ॥ रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आइऩ ॥ध्रु.॥ सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥2॥ तुका ह्मणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥3॥
142
नुगवे तें उगवून सांगितलें भाइऩ । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाइऩ ॥1॥ आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥ कमाइऩस मोल येथें नका रीस मानू। निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥2॥ तुका ह्मणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥3॥
143
हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥1॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होइऩल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥ काय पाहातां हे भाइऩ । हरुषें नाचा धरा घाइऩ । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥2॥ जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका ह्मणे काय। किळकाळ तें बापुडें ॥3॥
144
अवघे गोपाळ ह्मणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥1॥ घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं । ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥ एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा । एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥2॥ एकीं िस्थराविल्या गाइऩ रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती। एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला ह्मणती एक हुंबरी घेती ॥3॥ एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें । गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥4॥ एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें जैसें होतें शिळें संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥5॥ एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा। एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुिद्ध रे केला अवघ्यां वाखा ॥6। तुका ह्मणे आतां कान्होबा आह्मां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आह्मांपाशीं तें तुज अवघें चि ठावें। मोकलितां तुह्मी शरण आह्मी कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥7॥
145
बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥1॥ पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥2॥ तुका ह्मणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा वाटों नेदी विषम ॥3॥
146
आह्मां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥1॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥ खेळ खेळे न पडे डाइप । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाइप । कोणी कोडीं उगवीती ॥2॥ तुका ह्मणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥3॥
147
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । ह्मणती आणा सिदोया ॥1॥ देती आपुलाला झाडा। गाइऩ बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकडएाचा हरि मेळीं ॥ध्रु.॥ आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥2॥ भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥3॥ मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥4॥ एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रह्मानंदें । तुका ह्मणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥5॥
148
यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोया सकळी । काला करूं आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुह्मामाजी देतों ॥1॥ ह्मणती बरवें गोपाळ । ह्मणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें। खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे । ह्मणती गोड जालें । ह्मणती गोड जालें ।आणिक देइप । नाहीं पोट धालें ॥2॥ हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देऊनियां मिठी। पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥3॥ ह्मणती ठकडा रे कान्हा। लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या । अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर ह्मणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥4॥ एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी। गोळा न साहवे हरि । ह्मणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । ह्मणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥5॥ आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे । वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥6॥ करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे । एक एकाचें उिच्छष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥7॥ नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी । ह्मणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥8॥ गाइऩ विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार। जालें यमुनेचें िस्थर । जळ वाहों ठेलें । देव पाहाती सकळ। मुखें घोटूनियां लाळ । धन्य ह्मणती गोपाळ । धिग जालों आह्मी॥9॥ ह्मणती कैसें करावें । ह्मणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥10॥ आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । ह्मणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । ह्मणती जाणे जीवीचें । ह्मणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥11॥ धन्य दिवस काळ। आजी पावला गोपाळ । ह्मणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गडी। एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥12॥ तुझा संग बरवा । नित्य आह्मां द्यावा । ऐसें करूनि जीवा। नित्य देवा चालावें । तंव ह्मणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी। आतां जाऊं खेळीमेळीं । गाइऩ चारावया ॥13॥ तुका ह्मणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाइऩ गोपाळांसि केली। आपण यांसरी । आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आह्मांसहित ॥14॥
149
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥1॥ वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥ उरलें तें सांडा काम नका करूं गोवी। हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥2॥ निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाइऩट ॥3॥ कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥4॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका ह्मणे देवें रूपें केल्या तन्मय ॥5॥
फुगडएा - अभंग 2 150
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥1॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥2॥ त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥3॥ आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥4॥ तुका ह्मणे तुजमजमध्यें एक भाव। सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥5॥
151
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥1॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥ हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोिळतां लागे माती ॥2॥ सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥3॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोिळसी काय ॥4॥ तुका ह्मणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥5॥
॥2॥
लखोटा - अभंग 1
152
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥1॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली। धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥2॥ अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥3॥ बैस भावा पाठीं। ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥4॥ पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥5॥ आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥6॥ नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका ह्मणे येरी । पांगविल्या पोरी ॥7॥
हुंबरी - अभंग 1
153
तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥1॥ चेंडुवासवें घातली उडी । नाथिला कािळया देऊनि बुडी ॥2॥ अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥3॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥4॥ जाणो तो ठावा आहेसि आह्मां । तुवां आपुला मामा मारियेला ॥5॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥6॥
॥1॥
हमामा - अभंग 2
154
मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥1॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥ मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥2॥ तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाऑयाची ओल ॥3॥ मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥4॥ मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥5॥ आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥6॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥7॥
155
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर। करी येरझार चौयाशीची ॥1॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाइपऩ पडिलें आपणची ॥ध्रु.॥ दुसया पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें। दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥2॥ तिसया पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे िस्थर । सोस सोस करितां डाइप पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥3॥ चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुयापाटिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाइप ॥4॥ हमामा घालितां भ्याला तुका त्यानें सांडिली गडएाची सोइऩ । यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गाइऩ ॥5॥ ॥2॥
गाइऩ - अभंग 1 156
आह्मां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥1॥ वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥ वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥2॥ चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥3॥ तुका ह्मणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥4॥ ॥1॥
कांडण - अभंग 2 157
सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुिद्ध गे ॥1॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमिळणी जंव मिळें ॥2॥ एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥3॥ सरलें कांडण पाकसििद्ध करी । मेळवण िक्षरीसाकरेचें ॥4॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥5॥ तुका ह्मणे मज माहेरीं आवडी । ह्मणोनि तांतडी मूळ केलें ॥6॥
158
सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥1॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥ वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥2॥ कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥3॥ तुका ह्मणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥4॥
॥2॥
आडसण दळण - अभंग 1
159
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥1॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥ सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥2॥ सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दिळल्या जेवण जैसें तैसें ॥3॥ सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥4॥ दिळतां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥5॥ सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका ह्मणे ॥6॥
॥1॥
दळण - अभंग 1
160
शुद्ध दळणाचें सुख सांगों काइऩ । मानवित सइऩबाइऩ तुज ॥1॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥ शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥2॥ शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥3॥ तुका ह्मणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥4॥
॥1॥
161
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥1॥ वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥2॥ तुका ह्मणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥3॥
162
याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥1॥ आजि देतों पोटभरी । पुरे ह्मणाल तोंवरी ॥ध्रु.॥ हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥2॥ तुका ह्मणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥3॥
163
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥1॥ तुह्मी व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥ वाहाती त्या धारा। घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥2॥ तुका ह्मणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥3॥
164
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥1॥ धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥2॥ तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥3॥
165
धालें मग पोट । केला गडएांनी बोभाट ॥1॥ ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥ खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥2॥ तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥3॥
166
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥1॥ ह्मणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥ त्याविण हे नासी नव्हे दुसरिया ऐसी ॥2॥ सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥3॥
167
आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥1॥ मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥ कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥2॥ बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥3॥
168
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥1॥ आह्मी न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥ न साहावे भार। बहु लागतो उशीर ॥2॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥3॥
हाल - अभंग 2 169
यमुनेतटीं मांडिला खेळ । ह्मणे गोपाळ गडियांसि ॥1॥ हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥ नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥2॥ तुका ह्मणे कान्हो तिळतांदऑया । जिंके तो करी आपुला खेऑया ॥3॥
170
बळें डाइप न पडे हरी । बुिद्ध करी शाहणा तो ॥1॥ मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥2॥ तुका ह्मणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥3॥
॥2॥
सुतुतू - अभंग 1 171
जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥1॥ घाली सुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बिळया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥ खेिळया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥2॥ बिळया गांढएा तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥3॥ हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेिळया चांग ॥4॥ मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥5॥ आपल्या बळें खळे रे भाइऩ । गडियाची सांडोनि सोइऩ ॥6॥ तुका ह्मणे मी खेिळया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥7॥
॥1॥
172
अनंत ब्रह्मांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥1॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥2॥ विश्वव्यापक कमळापती। त्यासि गौळणी कडिये घेती ॥3॥ तुका ह्मणे नटधारी। भोग भोगून ब्रह्मचारी ॥4॥
173
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥1॥ होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥ प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥2॥ तुका ह्मणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥3॥
174
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥1॥ चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी। एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥ वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥2॥ अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥3॥ घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥4॥ रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥5॥ बोलों नेदी ह्मणे स्थीर । खुणा दावी खा रे क्षीर ॥6॥
175
धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥1॥ अरे कृष्णा इंद्र अमर इिच्छती । कोण तयांप्रति येइल आतां ॥2॥ तुका ह्मणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥3॥
176
तुह्मी गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥1॥ इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥ मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥2॥ तुका ह्मणे त्यांसी