अमृतानुभव

Wikibooks कडून

  [ श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हा ग्रंथ sanskritdocuments.org वरून उद्धृत केला गेला आहे ह्याची नोंद येथे असणे आवश्यक आहे ] 

अमृतानुभव प्रकरण पहिले शिवशक्तिसमावेशन

यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् । श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥ १ ॥
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी । जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ २ ॥
सार्द्धं केन च कस्यार्द्धं शिवयोः समरूपिणोः । ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥ ३ ॥
अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् । तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥ ४ ॥
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये । क्षिणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ ५ ॥
ऐसी इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें । तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ १-१ ॥
जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरीं । चारुस्थळीं येकाहारी । एकांगाची ॥ १-२ ॥
आवडीचेनि वेगें । येकयेकातें गिळिती अंगें । कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥ १-३ ॥
जे एकचि नव्हे एकसरें । दोघां दोनीपण नाहीं पुरें । काइ नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥ १-४ ॥
कैसी स्वसुखाचि आळुकी । जे दोनीपण मिळोनि येकीं । नेदितीचि कवतिकीं । एकपण फुटों ॥ १-५ ॥
हा ठाववरी वोयोगभेडें । जें बाळ जगायेव्हढें । वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ १-६ ॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा । परी नेदितीचि तिसरा । झोंक लागों ॥ १-७ ॥
जयां येक सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें । जें अनादि येकपणें । नांदती दोघें ॥ १-८ ॥
भेदु लाजौनि आवडी । येकरसीं देत बुडी । जो भोगणया ठाव काढी । द्वैताचा जेथें ॥ १- ९ ॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
कैसा मेळु आला गोडिये । दोघें न माती जगीं इये । कीं परमाणुही माजीं उवायें । मांडलीं आहाती ॥ १-११ ॥
जिहीं येकयेकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण । जियें दोघें जिऊ प्राण । जियां दोघां ॥ १-१२ ॥
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिघे । तैं दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ १-१३ ॥
जिया दोघांमाजीं येकादें । विपायें उमजलें होय निदे । तरी गरवात गिळूनि नुसुधें । कांहीं ना कीं ॥ १-१४ ॥
दोहों अंगाचिये आटणी । गिंवसीत आहाती येकपणीं । जाली भेदाचिया वाहाणी । आधाधीं जियें ॥ १-१५ ॥
विषो येकमेकांचीं जियें । जियें एकमेकांचीं विषइयें । जियें हीं दोघें सुखियें । जियें दोघें ॥ १-१६ ॥
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे । जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
दो दांडीं एकि श्रुति । दोहों फुलीं एकी दृति । दोहों दिवीं दीप्ति । येकीचि जेवीं ॥ १-१८ ॥
दो ओठीं येकी गोठी । दो डोळां येकी दिठी । तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । येकीच जेवीं ॥ १-१९ ॥
दाऊनि दोनीपण । येक रसाचें आरोगण । करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ १-२० ॥
जे स्वामिचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता । जियेवीण सर्व कर्ता । कांहीं ना जो ॥ १-२१ ॥
जें कीं भाताराचें दिसणें । भातारुचि जियेचें ससणें । नेणिजती दोघेंजणें । निवडूं जिये ॥ १-२२ ॥
गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु । निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥
समग्र दीप्ति घेतां । जेविं दीपुचि ये हातां । तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवुचि लाभे ॥ १-२४ ॥
जैसी सूर्यीं मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वचि गाभा । तैसी भेद गिळीत शोभा । येकचि जे ॥ १-२५ ॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक । तैसें द्वैतमिसें एक । बरवतसे ॥ १-२६ ॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु । जेणें दादुलेन सत्तविशेषु । शक्ति जाली ॥ १-२७ ॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवीहीं शिवपण । थारों न शके ते आपण । शिवें घडली ॥ १-२८ ॥
ऐश्वर्येंसी ईश्वरा । जियेचें आंग संसारा । आपण होऊन उभारा । आपणचि जे ॥ १-२९ ॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
ऐक्याचाही दुष्काळा । बहुपणाचा सोहळा । जियें सदैवेचिया लिळा । दाखविला ॥ १-३१ ॥
आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया । स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥ १-३२ ॥
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्ट्रत्वाचिया क्षोभा । जियेतें न देखतु उभा ॥ आंगचि सांडी ॥ १-३३ ॥
कांतेचिया भिडा । अवला होय जगायेव्हढा । आंगविला उघडा । जियेविण ॥ १-३४ ॥
जो हा ठावो मंदरूपें । उवायिलेपणेंचि हारपे । तो झाला जियेचेनि पडिपे । विश्वरूप ॥ १-३५ ॥
जिया चेवविला शिवु । वेद्याचे बोणें बहु । वाढि तेणेंसि जेऊं । धाला जो ॥ १-३६ ॥
निदैलेनि भातारें । जे विये चराचरें । जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥ १-३७ ॥
जंव कांतु लपो बैसे । तंव नेणिजे जिच्या दोषें । जियें दोघें आरिसे । जियां दोघां ॥ १-३८ ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
जया प्रियाचें जें आंग । जो प्रियुचि जियेचें चांग । कालउनी दोन्ही भाग । जेवितें आहाति ॥ १-४० ॥
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति । तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु । तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥ १-४२ ॥
राति आणि दिवो । पातलीं सूर्याचा ठावो । तैसीं आपुला साचि वावो । दोघेंही जियें ॥ १-४३ ॥
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरुढातियें । दशेचीही वैरियें । शिवुशक्ति ॥ १-४४ ॥
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळित येकार्थाचा उजिरा । नमो त्या शिववोहरा । ज्ञानदेवु म्हणे ॥ १-४५ ॥
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही । आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ १-४६ ॥
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी । सिंधूसीं प्रळयनिरीं । गंगा जैशी ॥ १-४७ ॥
वायु चळबळेंशीं जिराला व्योमाचिये कुशीं । आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ १-४८ ॥
तेवीं निहाळितां ययांते । गेले पाहणेंनसीं पाहतें । पुढती घरौतेंवरौतें । वंदिलीं तियें ॥ १-४९ ॥
जयांच्या वाहाणी । वेदकु वेद्याचें पाणी । न पिये पण सांडणी । आंगाचि करी ॥ १-५० ॥
तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा । तर्ही लिंगभेद पर्हा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे । हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
सांगतां वाचेतें वाचा । ठाउ वाच्य वाचकाचा । पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी । दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाईं दावितां । एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी । काई उणें दीप्तीवरी । गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥
मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ । आगळें निर्मळ । रूपा येकीं ? ॥ १-५७ ॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु काइ केला चिरटिया ? । कीं 'णकार' तिरेघटिया । भेदवला काई ? ॥ १-५८ ॥
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे । तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि । मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे । कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥
नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो । तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु । तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें । रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥



प्रकरण दुसरें श्रीगुरुस्तवन


आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु । अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ २-१ ॥ अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे । तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो कीं ॥ २-२ ॥ मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरु । जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदूं ॥ २-३ ॥ जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते । भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ २-४ ॥ कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना । द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ २-५ ॥ सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके । आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये ॥ २-६ ॥ बोधचंद्रचिया कळा । विखुरलिया येकवळा । कृपापुनीवलीळा । करी जयाची ॥ २-७ ॥ जो भेटलियाचि सवे । पुरति उपायांचे धांवे । प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ २-८ ॥ जयाचेनि अनवसरें । दृष्टाले दृश्याचें मोहिरें । जो भेटतखेंव सरे । बहुरुपचि हें ॥ २-९ ॥ अविद्येचें काळवखें । कीं स्वबोध सुदिनें फांके । सीतलें प्रसादार्कें । जयाचेंनि ॥ २-१० ॥ जयाचेनि कृपासलिलें । जीउ हा ठाववरी पाखाळे । जें शिवपणहि वोंविळें । अंगी न लवी ॥ २-११ ॥ राखों जातां शिष्यातें । गुरुपणहि धाडिलें थितें । तर्ही गुरुगौरव जयातें । सांडीचिना ॥ २-१२ ॥ एकपण नव्हे सुसास । म्हणोन गुरु-शिष्यांचें करोनि मिस । पाहणेंचि आपली वास । पाहतसे ॥ २-१३ ॥ जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें । परिणमे अपारें । बोधामृतें ॥ २-१४ ॥ वेद्या देतां मिठी । वेदकुहि सुये पोटीं । तर्ही नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ॥ २-१५ ॥ जयाचेनि सावायें । जीवु ब्रह्म उपर लाहे । ब्रह्म तृणातळीं जाये । उदासे जेणें ॥ २-१६ ॥ उअपस्तिवरि राबतिया । उपाय फळीं येती मोडोनियां । वरिवंडले जयाचिया । अनुज्ञा कां ॥ २-१७ ॥ जयाचा दिठिवावसंतु । जंव न रिघे निगमवनाआंतु । तंव आपुलिये फळीं हातु । न घेपतिही ॥ २-१८ ॥ पुढें दृष्टीचेनि आलगें । खोंचि कीं निवटी मागें । येव्हडिया जैता नेघे । आपणपें जो ॥ २-१९ ॥ लघुत्वाचेनि मुद्दलें । बैसला गुरुत्वाचे शेले । नासूनि नाथिलें । सदैव जो ॥ २-२० ॥ नाहीं जे जळीं बुडिले । तै घनवटें जेणें तरिजे । जेणें तरलियाहि नुरिजे । कवणिये ठाईं ॥ २-२१ ॥ आकाश हे सावेव । न बंधे आकाशाची हांव । ऐसें कोण्ही येक भरीव । आकाश जो ॥ २-२२ ॥ चंद्रादि सुसीतळें । घडलीं जयाचेनि मेळें । सूर्य जयाचेनि उजाळें । कडवसोनि ॥ २-२३ ॥ जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे । शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ २-२४ ॥ चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैतदुणीचें । तर्ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ २-२५ ॥ जो उघड किं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे । असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ २-२६ ॥ आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळऊं अनुमानाची मांदी । हा प्रमाणाहि वो नेदी । कोण्हाहि मा ॥ २-२७ ॥ जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसिं चावळों बैसे । दुजयाचा रागीं रुसे । येकपणा जो ॥ २-२८ ॥ प्रमाणापरि सरे । तैं प्रमेयचि आविष्करे । नवल मेचुं ये धुरे । नाहींपणाची ॥ २-२९ ॥ कांहींबाहीं अळुमाळु । देखिजे येखादे वेळु । तरी देखे तेहि विटाळु । जया गांवीं ॥ २-३० ॥ तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें । आंगीं लाउनि नाडिलें । नांवचि येणें ॥ २-३१ ॥ नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां कें निवृत्ति ? । तरी या नामाचि वायबुंथी । सांडीचिना ॥ २-३२ ॥ निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? । तरि कैसा बैसे ठाईं । निवृत्ति-नामाच्या ? ॥ २-३३ ॥ सूर्यासि अंधकारु । कैं झाला होता गोचरु ? । तर्ही तमारि हा डगरु । आलाचि कीं ॥ २-३४ ॥ लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे । न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ २-३५ ॥ हां गा मायावशें दाविसी । तें मायिक म्हणोन वाळिसी । अमायिक तंव नव्हसी । कवणाहि विषो ॥ २-३६ ॥ शिवशिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ? । येकाहि निर्धारा धरूं । देतासि कां ? ॥ २-३७ ॥ नामें रूपें बहूवसें । उभारूनि पाडिलीं ओसें । सत्तेचेनि आवेशें । तोषलासि ना ? ॥ २-३८ ॥ जिउ घेतलिया उणे । चालों नेदिसी साजणें । भृत्यु उरे स्वामीपणें । तेंहि नव्हे ॥ २-३९ ॥ विशेषाचेनी नांवें । आत्मत्वही न साहावे । किंबहुना न व्हावें । कोण्हीच या ॥ २-४० ॥ राति नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया । नुरेचि जेवी चेइलिया । नीद जैसी ॥ २-४१ ॥ कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव । नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ २-४२ ॥ याच्या हातांपायां पडे । तरी वंद्यत्वें पुढें न मंडे । न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ २-४३ ॥ आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं । हावंद्य नव्हें तेवीं । वंदनासी ॥ २-४४ ॥ कां समोरपण आपलें । न लाहिजे कांहीं केलें । तैसें वंद्यत्व घातलें । हारौनि येणें ॥ २-४५ ॥ आकाशाचाआरिसा । नुठे प्रतिबिंबाचा ठसा । हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासी ॥ २-४६ ॥ परी नव्हे तरी नव्हो । हें वेखासें कां घेवो । परी वंदीतयाहि ठावो । उरों नेदी ॥ २-४७ ॥ आंगौनि येकुणा झोळु । फेडितांचि तो तरी बाहिरिळू । कडु फिटे आंतुलु । न फेडितांचि ॥ २-४८ ॥ नाना बिंबपणासरिसें । घेऊनि प्रतिबिंब नासे । नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदितेंनसीं ॥ २-४९ ॥ नाहीं रूपाचि जेथें सोये । तेथें दृष्टीचें कांहींचि नव्हे । आम्हां फळले हे पाये । ऐसिया दशा ॥ २-५० ॥ गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका । ते का होईल पुळिका । कापुराचिया ॥ २-५१ ॥ तया दोहों परस्परें । होय ना जंव मेळहैरें । तंव दोहीचेंही सरे । सरिसेंचि ॥ २-५२ ॥ तेविं देखेना कायी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें । चेइलिया कांतें । स्वप्नींचें जेवीं ॥ २-५३ ॥ किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथें उपखा । फेडोनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥ २-५४ ॥ याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपण रूप नाहीं । आणि गुरु-शिष्य दुबाळीही । पवाडु केला ॥ २-५५ ॥ कैसा आपणया आपण । दोंविण सोइरेपण । हा यहूनि विलक्षण । नाहींना नोहे ॥ २-५६ ॥ जग आघवें पोटीं माये । गगनायेव्हढे होऊनि ठाये । तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥ २-५७ ॥ कां पूर्णते तरि आधारु । सिंधु जैसा दुर्भरु । तैसा विरुद्धेयां पाहुणेरु । याच्या घरीं ॥ २-५८ ॥ तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं । परि सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ २-५९ ॥ येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ? । विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥ म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु । श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ २-६१ ॥ कां सुवर्ण आणि लेणें । वसतें येकें सुवर्णें । वसतें चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ २-६२ ॥ नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु । गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥ इतैसा गुरुशिष्यमिसें । हाचि येकु उल्हासे । जर्ही कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ २-६४ ॥ आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी । आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ २-६५ ॥ पहापा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद येकला । परि चेता चेवविता जाहला । दोन्ही तोचि ॥ २-६६ ॥ जे तोचि चेता तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हाचि बुझावी । गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ २-६७ ॥ दर्पणेवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा । भोगितो तरि लीळा । सांगतों हें ॥ २-६८ ॥ एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्यासी विसकुसों । सोईरिकीचा अतिसो । पोखितसे ॥ २-६९ ॥ निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव । जया निवृत्तीची राणीव । निवृत्तिचि ॥ २-७० ॥ वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें । आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ २-७१ ॥ आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति । प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ २-७२ ॥ वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ । तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ २-७३ ॥ गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी । तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ २-७४ ॥ तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण । घेयावया फुलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ २-७५ ॥ दिठी मुखाचिये बरवे । पाथीकडोनि जैं पावे । तैं आरिसे धांडोलावे । लागती काई ? ॥ २-७६ ॥ कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया । काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ २-७७ ॥ म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधोनि । ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ २-७८ ॥ ऐसें करणियावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण । तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ २-७९ ॥ आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरु प्रणामें येणें । फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ २-८० ॥ ॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे गुरुस्तवनम् नाम द्वितीय प्रकरणं संपूर्णम् ॥



प्रकरण तिसरें वाचाऋण परिहार


ययांचेनि बोभाटे । आत्मयाची झोंप लोटे । पूर्ण तर्ही ऋण न फिटे । जें चेणोंचि नीद कीं ॥ ३-१ ॥ येर्हवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं । अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ ३-२ ॥ देहासवे हातपाये । जाती , मनासवें इंद्रियें । कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ ३-३ ॥ ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं । तेवीं अविद्येचे संबंधी । आटती इया ॥ ३-४ ॥ मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती । जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ३-५ ॥ लवण अंगें विरे । परी स्वादें जळीं उरे । नीद मरोनि जागरें । जिइजे निदें ॥ ३-६ ॥ तेवीं अविद्येसवें । चौघीं वेंचती जीवें । तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि या ॥ ३-७ ॥ हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा । तरी हाही शिणलेवा । बोधरूपेंची ॥ ३-८ ॥ येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी । दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ ३-९ ॥ जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिंवसी । तेचि यथा बोधेंसी । निमाली उठी ॥ ३-१० ॥ परि जीती ना मेली । अविद्या हे जाकळी । बन्धमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ ३-११ ॥ मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? । अज्ञान घरी त्राये । वाउगीची ॥ ३-१२ ॥ बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें । येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ ३-१३ ॥ घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण । मानीत असे ते जाण । म्हणो ये की ॥ ३-१४ ॥ म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? । मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ ३-१५ ॥ आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें । म्हणितलें असे । सदाशिवें ॥ ३-१६ ॥ आणि वैकुंठींचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें । बांधिजे हें बोलणें । बहू केलें ॥ ३-१७ ॥ परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें । मानु तेहि लाभे । न बोलतांही ॥ ३-१८ ॥ जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ । तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ? ॥ ३-१९ ॥ ज्ञानें श्लाघ्यतु आले । तैं ज्ञानपण धाडिलें वांये । दीपवांचून दिवा न लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ ३-२० ॥ आपणचि आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं । आपणपें गिंवशी । हें कीरु होय ? ॥ ३-२१ ॥ परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया । म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ ३-२२ ॥ तैसा ज्ञानरूप आत्मा । द्नानेंचि आपली प्रमा । करितसे सोहं मा । ऐसा बंधु ॥ ३-२३ ॥ जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणोनि भारी नावडे । ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ ३-२४ ॥ म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ अंगांचा । एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ ३-२५ ॥ आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु । करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ ३-२६ ॥ जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु । परि होऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ ३-२७ ॥ अंगीं लाविलिया विभूती । तैं परमाणुही झडती । परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥ ३-२८ ॥ ना वोहळला आंगीं जैसे । पाणीपणें नसे । तर्हीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ ३-२९ ॥ ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी । असे पायातळीं । रिगोनियां ॥ ३-३० ॥ तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें । आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ ३-३१ ॥ तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां । तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ ३-३२ ॥ म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती । या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥ ३-३३ ॥ ॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे वाचाऋणपरिहार नाम तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥




प्रकरण चवथें ज्ञानाज्ञानभेदकथन


आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें । नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥ कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला । मुख भोगी आपुला । आपणचि ॥ ४-२ ॥ ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी । तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जालें ॥ ४-३ ॥ लावी आंत ठावूनि कोपट । तो साधी आपणया सकट । का बांधलया चोरट । मोटेमाजी ॥ ४-४ ॥ आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें । ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जालें ॥ ४-५ ॥ अज्ञानाचा टेंका । नसतांही ज्ञानाधिका । फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ ४-६ ॥ दशाही ते निमालिया । येणें जें उवाया । तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ ४-७ ॥ उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणे । फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ ४-८ ॥ तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें । कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ ४-९ ॥ तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान । जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ ४-१० ॥ जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळाजळा दोहींतें । बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ ४-११ ॥ कीं विश्वाहि वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ । तैं तेज तम निखळ । तेंचि होय ॥ ४-१२ ॥ नाना नीद मारोनि । आपणपें हिरौनि । जागणें ठाके होवोनि । जागणेंचि ॥ ४-१३ ॥ तैसे अज्ञान आटोनियां । ज्ञान येतें उवाया । ज्ञानाज्ञान गिळूनियां । ज्ञानचि होय ॥ ४-१४ ॥ ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे । ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥ कां तेजांतरें नाटोपे । कोण्हे तमें न सिंपे । तें उपमेचें जाउपें । सूर्यचि होय ॥ ४-१६ ॥ म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे । तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जें ॥ ४-१७ ॥ परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें । काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ ४-१८ ॥ आकाश आपणया रिगे ? । कायी आगि आपणया लागे ? । आपला माथा वोळघें । आपण कोण्ही ? ॥ ४-१९ ॥ दिठि आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ? । नादु आपलें आइकें ? । नादपण ॥ ४-२० ॥ सूर्य सूर्यासि विवळे ? । कां फळ आपणया फळे ? । परिमळु परिमळें । घेपतु असे ? ॥ ४-२१ ॥ तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण । म्हणौनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ ४-२२ ॥ आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे । तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ ४-२३ ॥ जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे । मा तेज जर्ही होये । तेजासी काईं ? ॥ ४-२४ ॥ तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें । आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ ४-२५ ॥ तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था । तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥ शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता होये सिद्धु ? । नसता हा अपवादु । वस्तुसि जो ॥ ४-२७ ॥ माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे । तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥ कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें । तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥ घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे । सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥ म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण । नोहूनि असवेंवीण । असणें जें ॥ ४-३१ ॥ परी आणिका कां आपणया । न पुरे विषो होआवया । म्हणोनि न असावया । कारण कीं ॥ ४-३२ ॥ जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला । आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ । परी जिवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे । हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ ४-३४ ॥ दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणहि मोडे । परी नाहीं नोहे फुडे । तें जाणेचि ते ॥ ४-३५ ॥ कां काळा राहे काळवखा । तो आपणया ना आणिका । न चोजवे तर्ही आसिका । हा मी बाणे ॥ ४-३६ ॥ तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानुसवाणें । नसोनि असणें । ठाये ठावो ॥ ४-३७ ॥ निर्मळपणीं आपुळा । आकाशाचा संचु विराला । तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ ४-३८ ॥ कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारपलिया पोखरणीं । हें आणिकावांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ ४-३९ ॥ आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे । आहे नाहीं ऐसें । सांडोनिया ॥ ४-४० ॥ निदेचें नाहींपण । निमालियाहि जागेंपण । असिजे कां नेण । कोणी न होऊनि जैसें ॥ ४-४१ ॥ कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे । तो नेलियां म्हणिजे । तेणेंवीण ॥ ४-४२ ॥ परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग । ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ ४-४३ ॥ ॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेदकथनं नाम चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥




प्रकरण पांचवे सच्चिदानंदपदत्रयविवरण


सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीं उणे लेख । जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ ५-१ ॥ कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक । द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ ५-२ ॥ उजाळ दृति मार्दव । या तिन्हीं तिहीं उणीव । हें देखिजे सावेव । कापुरीं एकीं ॥ ५-३ ॥ आंगें कीर उजाळ । कीं उजाळ तोचि मवाळ । कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जें ॥ ५-४ ॥ ऐसें एके कापुरपणीं । तिन्ही इये तिन्ही उणी । इयापरी आटणी । सत्तादिकांची ॥ ५-५ ॥ येर्हवीं सच्चिदानंदभेदें । चालिलीं तिन्ही पदें । परि तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥ ५-६ ॥ सत्ताचि कीं सुख प्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु । हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ ५-७ ॥ शुक्लपक्षींच्या सोळा । दिवसा वाढती कळा । परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ ५-८ ॥ थेंबीं पडतां उदक । थेंबीं धरूं ये लेख । परि पडिला ठायीं उदक । वांचूनि आहे ? ॥ ५-९ ॥ तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति । जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ ५-१० ॥ दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें । निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ ५-११ ॥ ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्ही इयें । लोटितां जाली त्राये । सत्तादिकां ॥ ५-१२ ॥ एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु । अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥ सूर्याचेनि प्रकशें । जें कांहीं जड आभासें । तेणें तो गिंवसें । सूर्यु कयी ? ॥ ५-१४ ॥ तेवीं जेणें तेजें । वाचेसि वाच्य सुजें । ते वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ? ॥ ५-१५ ॥ विषो नाहीं कोण्हाहि । जया प्रमेयत्वचि नाहीं । तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होय ॥ ५-१६ ॥ प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे । तें कायि स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठायीं ? ॥ ५-१७ ॥ एवं वस्तूसि जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्वता । मग जाणणें आणि जाणता । कैचें उरे ? ॥ १८ ॥ म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक । नव्हती हे शेष । विचाराचे ॥ ५-१९ ॥ ऐसेनि इयें प्रसिद्धे । चालिलीं सच्चिदानंद पदें । मग द्रष्ट्या स्वसंवादें । भेटती जेव्हां ॥ ५-२० ॥ ते वेळीं वरिसोनि मेघु । समुद्र होउनि वोघु । सरे दाऊनि मागु । राहे जैसा ॥ ५-२१ ॥ फळ विऊनि फुल सुके । फळनाशे रस पाके । तोहि रस उपखें । तृप्तिदानीं ॥ ५-२२ ॥ कां आहुति अग्नीआंतु । घालूनि वोसरे हातु । सुख चेवऊनि गीतु । उगा राहे ॥ ५-२३ ॥ नाना मुखा मुख दाऊनी । आरिसा जाय निगोनि । कां निदैलें चेववुनी । चेववितें जैसें ॥ ५-२४ ॥ तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा । तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥ ५-२५ ॥ जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे । साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥ ५-२६ ॥ मग आपलियाकडे । मावितया से पडे । तैं लाजहिला जो आखुडे । मविते जैसें ॥ ५-२७ ॥ जैसी सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे । मा सत्तात्व संभवे । सत्तेसि कायि ? ॥ ५-२८ ॥ आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे । आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं इये ॥ ५-२९ ॥ नीद प्रबोधाच्या ठायीं । नसे तैसें जागणेंहि । तेवीं चिन्मात्रचि मा काई । चिन्मात्रीं ये ? ॥ ५-३० ॥ ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें । मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ ५-३१ ॥ म्हणोनि सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें । सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ ५-३२ ॥ आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक । सुखमात्रचि एक । स्वयें आथी ॥ ५-३३ ॥ वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें । म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ ५-३४ ॥ तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें । हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥ जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंकें अवतरे । मां डंकूचि तैं भरे । कोणकोणा ? ॥ ५-३६ ॥ तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें । आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ ५-३७ ॥ आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख । तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ ५-३८ ॥ सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडोनिया निदसुरिया । आपुलिया हात चोरिया । आपणचि जो ॥ ५-३९ ॥ न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु । तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥ कां न सज्जितां विणा । तो नादु जो अबोलपणा । तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ ५-४१ ॥ नाना पुष्पाचिया उदरा । न येतां पुष्पसारा । आपणचि भंवरा । होआवे पडे ॥ ५-४२ ॥ नाना न रांधितां रससोये । ते गोडी पां कैसी आहे । हें पाहणें तें नोहे । आणिकाजोगें ॥ ५-४३ ॥ तैसें सुखपणा येवो । लाजे आपुलें सुख पावों । तें आणिकां चाखों सुवों । येईल काईं ? ॥ ५-४४ ॥ दिहाचिया दुपारीं । चांदु जैसा अंबरीं । तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥ ५-४५ ॥ रूप नाहीं तैं लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य । क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥ ५-४६ ॥ जैं मनाचा अंकूर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें । तोचि हन माजे । तरीचि घडे ॥ ५-४७ ॥ कां वाद्यविशेषाची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी । तैं नादु ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ ५-४८ ॥ नाना काष्ठाचिया विटाळा । वोसरलिया अनळा । लाग्णें तैं केवळा । अंगासीचि ॥ ५-४९ ॥ दर्पणाचेनि नियमें । वीणचि मुखप्रमे । आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥ ५-५० ॥ न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें । ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ ५-५१ ॥ एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य । तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ ५-५२ ॥ आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें । जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ ५-५३ ॥ एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण । दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ ५-५४ ॥ अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती । येथें उठली पांती । लक्षणाची ॥ ५-५५ ॥ उपाय मागील पाय । घेऊन झाले वाय । प्रतीति सांडिली सोय । प्रत्ययाची ॥ ५-५६ ॥ येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि झाला साचारु । स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ ५-५७ ॥ नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला । नुसुधेपणें थोंटावला । अनुभउ जेथे ॥ ५-५८ ॥ भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा । करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ ५-५९ ॥ कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा । सांडी तेव्हेळीं उभा । कैंचा कीजे ? ॥ ५-६० ॥ तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥ अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी । तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥ कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी । मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥ चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी । कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥ उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती । वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥ म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज । आतां निरूपणाचें भोज । वोळगे जर्ही ॥ ५-६६ ॥ आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें । मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥ येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें । जर्ही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥ ॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥



प्रकरण सहावें शब्दखंडण


बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥ ६-१ ॥ पहातें आरिसा पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे । परि दर्पणें येणें होये । न पाहतें , पाहतें ॥ ६-२ ॥ वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ आपण तंव खपुष्प । परि फळ ते जगद्रूप । शब्द मवीतैं उमप । कोण आहे ? ॥ ६-४ ॥ विधिनिषेधांचिया वाटा । दाविता हाचि दिवटा । बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाचि ॥ ६-५ ॥ हा अविद्येचा आंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे । न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ ६-६ ॥ शुद्ध शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जिउ भरी । जेवीं आंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥ ६-७ ॥ जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला । आत्मा बोलें भेटला । आपणयां ॥ ६-८ ॥ दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला । म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥ ६-९ ॥ जे प्रवृत्ति आअणि निवृत्ति । विरुद्धा ह्या हातु धरिती । मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥ ६-१० ॥ सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे । गोमटे काय शब्दाचें । येकैक वानूं ॥ ६-११ ॥ किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । परी ययाही संबंधु । नाहीं येथें ॥ ६-१२ ॥ आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे । स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ ६-१३ ॥ आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे । तरी वस्तूसी वस्तु दुसरें । असेना कीं ॥ ६-१४ ॥ आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? । काय जीभ जिभितें । चाखे न चाखे ? ॥ ६-१५ ॥ जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ आणिक येक शब्दें । काज कीर भलें साधे । परि धिंवसा न बंधे । विचारु येथें ॥ ६-१९ ॥ कां जे बोलें अविद्याअ नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे । हें म्हणतखेवो पिसें । आलेंचि कीं ॥ ६-२० ॥ सूर्यो राति पां मारील । मा आपणया उदो करील । हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ ६-२१ ॥ चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? । कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ ६-२२ ॥ म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाही निरुती । नाहीं आत्मा आत्मस्थिति । रिगे ऐसा ॥ ६-२३ ॥ अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें । मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ ६-२४ ॥ इंद्रधनुष्या सितें । कवण धनवईन लाविजेतें । तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ ६-२५ ॥ अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका । तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ ६-२६ ॥ साहे बोलाची बळघी । ऐसी अविद्या असे जगीं । तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ ६-२७ ॥ नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे । तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ ६-२८ ॥ नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु । तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ ६-२९ ॥ जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें । मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ ६-३० ॥ दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें । तेविं अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥ ६-३१ ॥ वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया । नागवें नागविलिया । विशेषु काई ॥ ६-३२ ॥ मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ । परि उपवासावेगळ । आनु आथी ? ॥ ६-३३ ॥ मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें । माउमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥ ६-३४ ॥ हें दिसे तैसें असे । तरी चित्रीचेनि पाउसें । वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥ ६-३५ ॥ कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें । तरी मसीचिया बोरबारें । कां सिणावें ? ॥ ६-३६ ॥ आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? । तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ ६-३७ ॥ अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ ६-३८ ॥ आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण । आपुल्या अभावीं आपण । साधीतसे ॥ ६-३९ ॥ का हीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? । वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ ६-४० ॥ अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा । सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥ ६-४१ ॥ हे अविद्या तरी मायावी । परि मायावीपणचि लपवी । साचा आली अभावी । आपुला हे ॥ ६-४२ ॥ बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं । आतां बोलू हातवसी । कवणापरी ॥ ६-४३ ॥ साउलियेतें साबळें । हालयां भोय आदळे । कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥ ६-४४ ॥ कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं । नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाचा ॥ ६-४५ ॥ उठावला वोथरे तवंका । तो सुनाथ पडे असिका । अविद्या नाशीं तर्का । तैसें होय ॥ ६-४६ ॥ ऐसी अविद्या नासावी । वाहेल जो जीवीं । तेणें साली काढावी । आकाशाची ॥ ६-४७ ॥ तेणें शेळीगळां दुहावीं । गुडघां वास पाहावी । वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ६-४८ ॥ जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू । कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । ६-४९ ॥ तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु । वारयाचे तांथु । वळु सुखें ॥ ६-५० ॥ तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू । तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥ ६-५१ ॥ घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू । सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ ६-५२ ॥ तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू । वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥ ६-५३ ॥ तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें । मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ ६-५४ ॥ अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें । आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ ६-५५ ॥ नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे । अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ६-५६ ॥ अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती । जेवी दुपारीं कां वाती । आंगणींचिया ॥ ६-५७ ॥ न पेरितां शेती । जे कीं सवगणिया जाती । तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ ६-५८ ॥ खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा । तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ६-५९ ॥ पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु । अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ ६-६० ॥ माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे । तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ ६-६१ ॥ गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ ६-६२ ॥ नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे । खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ ६-६३ ॥ स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु । परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ ६-६४ ॥ दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे । चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ ६-६५ ॥ चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा । जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६-६६ ॥ नुसुधियेचि साचा । मुका होय वाचरुकाचा । अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ ६-६७ ॥ तैसीं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें । उठलींच निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६-६८ ॥ अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? । अविद्यानाशीं विचारु । तैसा होय ॥ ६-६९ ॥ नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें । निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ ६-७० ॥ कैसीही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे । तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ ६-७१ ॥ आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई । परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ ६-७२ ॥ यालागिं अविद्येचिया मोहरां । उठलियाहि विचारा । आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ ६-७३ ॥ म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें । हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ ६-७४ ॥ आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया । येईल हें साविया । विरुद्धचि ॥ ६-७५ ॥ आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे देशीं । कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ ६-७६ ॥ गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? । तळहात काय वळघे । आपणयां ? ॥ ६-७७ ॥ सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? । परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ ६-७८ ॥ चराचरा पाणी पाजणी । करूं येईल येके क्षणीं । परि पाणियासि पाणि । पाजवे कायी ? ॥ ६-७९ ॥ साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा ऐसा । जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ६-८० ॥ कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील । वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ ६-८१ ॥ आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया । समोर होआवया । ठाकी आहे ? ॥ ६-८२ ॥ दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? । कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ ६-८३ ॥ चंदन चंदना लावी ? । रंगु रंगपणा रावी । मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैंचें ? ॥ ६-८४ ॥ सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी । रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ ६-८५ ॥ आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा । परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥ ६-८६ ॥ तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव । आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥ ६-८७ ॥ आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे । डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥ ६-८८ ॥ आरसा आपुलिये । आंगीं आपण पाहे । तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥ ६-८९ ॥ दिगंतापैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे । मा तियेका तियेचें । आंग फुटे ? ॥ ६-९० ॥ रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें । परि कायी कीजे नेणे । आपणापें चाखों ॥ ६-९१ ॥ तरि जिव्हे काई आपलें । चाखणें हन ठेलें ? । तैसे नव्हे संचलें । तेंचि तेकीं ॥ ६-९२ ॥ तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु । आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ ६-९३ ॥ कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें । जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ ६-९४ ॥ म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे । येईल ऐसा न लभे । उमसुं घेवों ॥ ६-९५ ॥ एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी । तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ६-९६ ॥ आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी । हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ ६-९८ ॥ आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं । अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥ ६-९९ ॥ बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें । कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ ६-१०० ॥ तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें । शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ ६-१०१ ॥ एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें । साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ ६-१०२ ॥ या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला । अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ ६-१०३ ॥ ॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम प्रकरणं संपूर्णम् ॥



प्रकरण सातवें अज्ञानखंडण


येर्हवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा । तैं तरि काना । खालींच दडे ॥ ७-१ ॥ अंडसोनि अंधारीं । खद्योत दीप्ति शिरी । तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥ ७-२ ॥ जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा । तेवीं अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥ ७-३ ॥ कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरूं । नये लेणा श्रृंगारूं । वोडंबरीचा ॥ ७-४ ॥ हें जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंहि आन न करी । काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ? ॥ ७-५ ॥ आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें । येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥ ७-६ ॥ असो आतां या प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों । मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानचि लटिकें ॥ ७-७ ॥ या अज्ञान ज्ञानातें । आंगींचि आहे जितें । तरी जेथें असे तयातें । नेण कां न करी ? ॥ ७-८ ॥ अज्ञान जेथ असावें । तेणें सर्वनेण होआवें । ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ ७-९ ॥ तरी शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे । तेणेचि तो गिंवसे । आश्रो जरी ॥ ७-१० ॥ तरी निठितां दुजें । जैं अज्ञान आहे बिजें । तैं तेचि आथी हे बुझे । कोण येथें ? ॥ ७-११ ॥ अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें । आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ? ॥ ७-१२ ॥ या लागिं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान । हें म्हणत खेंवो घेववी मौन । विरोधुचि ॥ ७-१३ ॥ आणि जाणति वस्तु येक । ते येणें अज्ञानें कीजे मूर्ख । तैं अज्ञान हे लेख । कवण धरी ? ॥ ७-१४ ॥ अहो आपणयाहि पुरता । नेणु न करवे जाणता । तयातें अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ? ॥ ७-१५ ॥ आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? । सुषुप्ती सुषुप्तया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ ७-१६ ॥ तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें । तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ ७-१७ ॥ ना तरी अज्ञान येक घडे । हें जयास्तव निवडे । तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ ७-१८ ॥ पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा । तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ ७-१९ ॥ इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी । तें न जळे तैं वाउगी । शक्तिचि ते ॥ ७-२० ॥ आंधारु कोंडुनि घरीं । घरा पडसायी न करी । तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ ७-२१ ॥ वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे । दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ ७-२२ ॥ तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके । तैं अज्ञान शब्दा लटिलें । आलेंच कीं ॥ ७-२३ ॥ येर्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया । कारण म्हणतां न्यावा । चुकी येईल कीं ॥ ७-२४ ॥ अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी । आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ ७-२५ ॥ स्वप्न आणि जागरु । आठउ आणि विसरु । इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ ७-२६ ॥ शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट । कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ ७-२७ ॥ नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों । तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ ७-२८ ॥ हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे । तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ ७-२९ ॥ अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे ? । ऐसीं काईसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ ७-३० ॥ अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज । जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । ७-३१ ॥ दुलांकूडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें । तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ ७-३२ ॥ का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो । सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ ७-३३ ॥ तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे । येर्हवीं अज्ञान होये । लागलाचि ॥ ७-३४ ॥ आत्मेनसी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं । वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ ७-३५ ॥ लवणाची मासोळी । जरी जाली निवाळी । तरी जळीं ना जळावेगळी । न जिये जेवीं ॥ ७-३६ ॥ जें अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे । म्हणोनि बोलणीं वाइसें । नायकावीं कीं ॥ ७-३७ ॥ दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? । ना दवडणें न साहे । जयापरी ॥ ७-३८ ॥ नाना पुनिवेचे आंधारें । दिहा भेणें रात्रीं महुरें । कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेवीं ॥ ७-३९ ॥ तियापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा । हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥ ७-४० ॥ तरी अज्ञान स्वरूपें कैसें । काय कार्यानुमेय असे । कीं प्रत्यक्षचि दिसे । धांडोळूं आतां ॥ ७-४१ ॥ अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी । ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ ७-४२ ॥ जैसी अंकुरेंसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ । तें बीज नव्हे केवळ । बीजकार्य होय ॥ ७-४३ ॥ कां शुभाशुभ रूपें । स्वप्नदृष्टी आरोपें । तें नीद नव्हे जाउपें । निदेचें कीं ॥ ७-४४ ॥ नाना चांदु एक असे । तो व्योमीं दुजा दिसे । तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे ॥ ७-४५ ॥ तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय । तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ॥ ७-४६ ॥ म्हणोनि प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्यविशेखीं । नेघे तें असेये विखीं । आनु नाहीं ॥ ७-४७ ॥ अज्ञान कार्यपणें । घेइजे तें अज्ञान म्हणे । तरी घेतांहि करणें । तयाचेंची ॥ ७-४८ ॥ स्वप्नीं दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन । तैसें कार्यचि अज्ञान । केवळ जरी ॥ ७-४९ ॥ तरी चाखिला गुळ गुळें । माखिलें काजळ काजळें । कां घेपे देपे शुळें । हालया सुळु ॥ ७-५० ॥ तैसें कारण अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें । तें अज्ञानचि मा काय कोणें । घेपे देपे ॥ ७-५१ ॥ आतां घेतें घेइजेतें ऐसा । विचारु नये मानसा । तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ? ॥ ७-५२ ॥ तंव प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जे बापा । तया आणि खपुष्पा । विशेषु काई ? ॥ ७-५३ ॥ मा हे प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी । येणें बोलें ही जाणावी । अज्ञानउखी ॥ ७-५४ ॥ एवं प्रत्यक्ष अनुमान । प्रमाणां भाजन । नहोनि जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ७-५५ ॥ ना स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये । मी अज्ञान ऐसें बिहे । मानूं साचें ॥ ७-५६ ॥ आत्मया स्वप्न दाऊं । न शके कीर बहू । परि ठायें ठाउ । निदेजउं नेणें ॥ ७-५७ ॥ हें असो जिये वेळे । आत्मपणेंचि निखळें । आत्मा अज्ञानमेळें । असे तेणें ॥ ७-५८ ॥ जैसें न करितां मंथन । काष्ठीं अवस्थान । जैसें कां हुताशन । सामर्थ्यांचें ॥ ७-५९ ॥ तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव । तैं कांहीं अज्ञान हांव । बांधतें कां ? ॥ ७-६० ॥ काइ दीप जैं न लाविजे । तैंचि काजळी फेडिजे । कां नुगवत्या वाळिजे । रुखाची छाया ॥ ६१ ॥ नाना नुठितां देहदशा । कालऊनि लाविजे चिकसा । न घडितां आरिसा । उटिजे काई ॥ ६२ ॥ कां वोहाच्या दुधीं । सायचि असावी आधीं । मग ते फेडूं इये बुद्धी । पवाडु कीजे ॥ ७-६३ ॥ तैसें आत्मयाच्या ठाई । जैं आत्मपणा ठवो नाहीं । तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ ७-६४ ॥ म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे । हें जालेंचि आहे आपैसें । आतां रिकामेंचि काइसें । नाहीं म्हणो ॥ ७-६५ ॥ ऐसाहि आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा । अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥ ७-६६ ॥ जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण । कीं सर्वांपरी मरण । मालवलें कीं ॥ ७-६७ ॥ नाना निदे नीद आली । कीं मूर्छां मूर्छें गेली । कीं आंधारी पडली । अंधकूपीं ॥ ७-६८ ॥ काअभाव अवघडला । का केळीचा गाभा मोडला । चोखळा आसुडला । आकाशाचा ॥ ७-६९ ॥ कां निवटलिया सूदलें विख । मुकियाचें बांधलें मुख । नाना नुठितां लेख । पुसिलें जैसें ॥ ७-७० ॥ तैसें अज्ञान आपुली वेळ । भोगी हेचि टवाळ । आतां तरी केवळ । वस्तु होऊनि नसे ॥ ७-७१ ॥ देखा वांझ कैसी विये ? । विरूढती भाजली बियें ? । कीं सूर्य कोण्हा लाहे । अंधारातें ? ॥ ७-७२ ॥ तैसा चिन्मात्रे चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा । घेतला तरी पवाडा । येईल काई ? ॥ ७-७३ ॥ जे सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें। ते दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥ ७-७४ ॥ नाना नीद धरावया हातीं । चेउनी उठिला झडती । ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥ ७-७५ ॥ तेवीं पाहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं पिसें काइसें । न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ ७-७६ ॥ एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी । न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ ७-७७ ॥ अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें । विचाराचे डोळे । देखते का ? ॥ ७-७८ ॥ ना निर्धाराचें तोंड न माखे । प्रमाण स्वप्नींही नाइके । कीं निरुती हन मुके । अनसाईपणा ॥ ७-७९ ॥ इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु । निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ ७-८० ॥ अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये शोभे । कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ ७-८१॥ नाना गगनौलाचिया माळा । वांजेच्या जालया गळा । घापती तो सोहळा । पाविजत असे ॥ ७-८२ ॥ आणून कांसवीचें तुप । भरू आकाशाचें माप । तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ७-८३ ॥ आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती । तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ ७-८४ ॥ म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें । परी आन येक स्फुरे । इयेविषयीं ॥ ७-८५ ॥ आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें । वस्तु ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ ७-८६ ॥ तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हडें । आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ ७-८७ ॥ जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हडें । उठिलें तरी रोकडें । देखतसों ॥ ७-८८ ॥ न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन । यया दृश्यानुमान । प्रमाण जालें ॥ ७-८९ ॥ ना तरी चंद्रु येक असे । तो व्योमीं दुणावला दिसे । तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ ७-९० ॥ भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजीं असती॥ ७-९१ ॥ तरी भरंवसेनि मुळें । पाणी घेती हें न टळें । तैसें अज्ञान कळें । दृष्यास्तव ॥ ७-९२ ॥ चेइलिया नीद जाये । निद्रिता तंव ठाउवी नोहे । परी स्वप्न दाऊनि आहे । म्हणों ये कीं ॥ ७-९३ ॥ म्हणोन वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येव्हडें फांके । तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥ ७-९४ ॥ अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें केउतें । काय दिवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ? ॥ ७-९५ ॥ अगा चंद्रापासून उजळ । जेणें राविली वस्तु धवळ । तयातें काजळ । म्हणिजतसे ॥ ७-९६ ॥ आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी । अज्ञान इया वहणी । मानूं तरी तें ॥ ७-९७ ॥ कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी अमा । तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ ७-९८ ॥ वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे । ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ ७-९९ ॥ तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु । तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ ७-१०० ॥ तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? । येर्हवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ ७-१०१ ॥ कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे । तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ ७-१०२ ॥ असे म्हणावयाजोगें । नाचरे कीर आंगें । परी नाहीं हें न लागे । जोडावेंचि ॥ ७-१०३ ॥ कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे । हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ ७-१०४ ॥ मिथ्यावादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली । विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ ७-१०५ ॥ जो निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येवढें काय चुके ? । परी दृश्याचिये न टेके । सोईं जो ॥ ७-१०६ ॥ वेद काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें । ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ ७-१०७ ॥ सूर्यो कोणा न पाहे ? । परि आत्मा दाविला आहे ? । गगनें व्यापिता ठाये । ऐसी वस्तु ॥ ७-१०८ ॥ देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी । तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ ७-१०९ ॥ बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके । मना संकल्प निके । याहीहुनि ॥ ७-११० ॥ विषयाची बरडी । अखंड घासती तोंडीं । तियें इंद्रियें गोडी । न घेपती हे ॥ ७-१११ ॥ परी नाहींपणासगट । खाऊनि भरिलें पोट । ते कोणाही सगट । कां फावेल ? ॥ ७-११२ ॥ जो आपणासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो । जे वाणी न सके चाखों । आपणापें ॥ ७-११३ ॥ हें असो नामें रूपें । पुढां सुनि अमूपें । जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ ७-११४॥ म्हणोनि आपलेंचि मुख । पाहावयाची भूक । न वाणे मा आणिक । कें रिघेल ? ॥ ७-११५ ॥ नाडिले जें वादीकोडें । आंतुचि बाहेर सवडे । तैसा निर्णो सुनाथा पडे । केला जेथें ॥ ७-११६ ॥ कां मस्तकान्त निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली । तयाची फांवली । बुद्धि जैसी ॥ ७-११७ ॥ तैसें टणकोनि सर्वथा । हे ते ऐसी व्यवस्था । करी तो चुके हाता । वस्तूचा जिये ॥ ७-११८ ॥ आतां सांगिजे तें केउतें । शब्दाचा संसारा नाहीं जेथें । दर्शना बीजें तेथे । जाणीव आणी ? ॥ ७-११९ ॥ जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें । फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥ ७-१२० ॥ आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण । द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ ७-१२१ ॥ कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? । ऐक्यासकट पोटें । आटोनि गेलीं ॥ ७-१२२ ॥ येव्हढेंही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे । उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ ७-१२३ ॥ दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी । उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ ७-१२४ ॥ दर्शनऋद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा । जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ ७-१२५ ॥ क्षणीं क्षणीं नीच नवी । दृश्याची चोख मदवी । दिठीकरवीं वेढवी । उदार जे ॥ ७-१२६ ॥ मागिलिये क्षणीचीं अंगें । पारुसी म्हणोनियां वेगें । सांडूनि दृष्टि रिगे । नवेया रूपा ॥ ७-१२७ ॥ तैसीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं । लेऊनि आणी । जाणतेपण ॥ ७-१२८ ॥ तया परमात्मपदीचें शेष । ना काहीं तया सुसास । आणि होय येव्हडी कास । घातली जेणें ॥ ७-१२९ ॥ सर्वज्ञतेची परी । चिन्मात्राचे तोंडवरी । परी तें आन घरीं जाणिजेना ॥ ७-१३० ॥ एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी । दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ ७-१३१ ॥ तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे । तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ ७-१३२ ॥ तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे । जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें ७-१३३ ॥ अंगें अंगवरी पहुडे । चेइला वेगळा न पडे । तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ ७-१३४ ॥ पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें । वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥ गुंफिवा ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा । भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥ ७-१३६ ॥ किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें । तरी सूर्यासि दुसरें । बोलों येईल ? ॥ ७-१३७ ॥ चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडिलिया बहुवसु । काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ ७-१३८ ॥ दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी । परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ ७-१३९ ॥ सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रर्जुना राया । तरी तो काय तिया । येकोत्तरावा ? ॥ ७-१४० ॥ सौकटाचिया वोजा । पसरो कां बहू पुंजा । परी ताथुवीं दुजा । भाव आहे ? ॥ ७-१४१ ॥ कोडीवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा । मीनला तर्ही वाचा । मात्र कीं ते ॥ ७-१४२ ॥ तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे । उठती लेखावेगळे । द्रष्टत्वेंचि ॥ ७-१४३ ॥ गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा । जाला तरी नुसधा । गूळचि कीं तो ॥ ७-१४४ ॥ तैसें हें दृश्य देखो । कीं बहू होऊनि फांको । परी भेदाचा नव्हे विखो । तेचि म्हणोनि ॥ ७-१४५ ॥ तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा । जर्ही विश्वा अशेखा । भरला आहे ॥ ७-१४६ ॥ दुबंधा क्षिरोदकीं । बाणें परी अनेकीं । दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ? ॥ ७-१४७ ॥ पातयाचि मिठी । नुकलितां दिठी । अवघियाची सृष्टी । पाविजे जरी ॥ ७-१४८ ॥ न फुटतां बीजकणिका । माजीं विस्तारे वटु असिका । तरी अद्वैतफांका । उपमा आथी ॥ ७-१४९ ॥ मग मातें म्यां न देखावें । ऐसेही भरे हावें । तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥ ७-१५० ॥ पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी । आपुलेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ ७-१५१ ॥ कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु । ना कूर्मी गिली विस्तारु । आपेंआप ॥ ७-१५२ ॥ अवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ ७-१५३ ॥ तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे । तया नांव वावटे । आपणपयां ॥ ७-१५४ ॥ सहजें आघवेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? । तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ ७-१५५ ॥ नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो । तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ ७-१५६ ॥ जें अनादिच दृश्यपणें । अनादिच देखणें । हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ ७-१५७ ॥ अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना । कीं दीप्तीसीं तपना । संबंधु कीजे ? ॥ ७-१५८ ॥ विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे फुडें । ना तें नाहीं तेव्हढें । नाहींची देखे ॥ ७-१५९ ॥ विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही । तर्ही दशा ऐसिही । देखतचि असे ॥ ७-१६० ॥ कापुराहि आथी चांदिणें । कीं तोचि न माखे तेणें । तैसें केवळ देखणें । ठायें ठावो ॥ ७-१६१ ॥ किंबहुना ऐसें । वस्तु भलतिये दशे । देखतचि असे । आपणपयातें ॥ ७-१६२ ॥ मनोरथांच